मॅक्रोजचा वापर

Dhatukam - Udyam Prakashan    11-Nov-2021   
Total Views |
बऱ्याच ठिकाणी मटेरियलची हाताळणी (हॅँडलिंग), टूल तुटल्याची (ब्रेकेज) तपासणी, विशेष आवर्तने (स्पेशल सायकल) या आधुनिक निर्मितीक्षेत्रातील साधन सामग्री नियंत्रित करण्यासाठी मॅक्रोजचा वापर केला जातो. या मॅक्रोजचा वापर कुठे, कसा केला जातो. त्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आदी गोष्टींबद्दल भाष्य करणारा लेख.
 
 
Use of macros_1 &nbs
 
मॅक्रो एक प्रोग्रॅमिंग टूल म्हणून वापरता येते. आधुनिक CAD/CAM प्रणालीबरोबरसुद्धा मॅक्रो प्रोग्रॅमिंग वापरता येते. सर्वसाधारण सी.एन.सी. यंत्रणामध्येदेखील याचा वापर करता येतो. परंतु बऱ्याच ठिकाणी मटेरियलची हाताळणी (हॅँडलिंग), टूल तुटल्याची (ब्रेकेज) तपासणी, विशेष आवर्तने (स्पेशल सायकल) या आधुनिक निर्मितीक्षेत्रातील साधन सामग्री नियंत्रित करण्यासाठी मॅक्रोजचा वापर केला जातो. तसेच कामाची स्थाने (वर्क पोझिशन), टूलची लांबी (लेंग्थ) आणि त्रिज्या (रेडियस) यांचे वर्क ऑफसेट घेताना मॅक्रोजचा चांगला वापर होतो. मॅक्रोजद्वारे आपोआप मोजमापे घेतली जातात. त्या मोजमापांप्रमाणे ऑफसेटचे इनपुट नियंत्रकाला (कंट्रोलर) दिले जातात. या कामासाठी खास अशी मोजमापन करणारी साधनसामग्री लागते. ही साधनसामग्री म्हणजे प्रोबिंग किंवा गेजिंग होय. 
 

मॅक्रोज प्रोग्रॅमिंग वापरायची काही क्षेत्रे
· सारख्या यंत्रभागांचा समूह
· ऑफसेट नियंत्रण (कंट्रोल)
· सानुकूल स्थिर आवर्तने (कस्टम फिक्स्ड् सायकल)
· टूलच्या वेगळ्या पद्धतीच्या हालचाली (मोशन)
· खास G कोड आणि M कोड
· गजर (अलार्म) आणि संदेशाची निर्मिती (मेसेज जनरेशन)
· नियंत्रण पर्यायांची (कंट्रोल ऑप्शन) बदली
· प्रोबिंग गेजिंग
· शॉर्टकट आणि युटिलिटीज  
 
कौशल्यासाठी आवश्यक गोष्टी
कोणत्याही क्षेत्रात कौशल्य मिळविण्यासाठी काही विशेष गुण जोपासावे लागतात. प्रोग्रॅमिंगमध्ये कौशल्य मिळविण्यासाठी मशीन शॉप आणि त्या संबंधित तंत्राचे ज्ञान, अनुभव पुरेसा होत नाही. प्रोग्रॅमिंगसाठी कोणत्या गोष्टींचे ज्ञान आणि अनुभव आवश्यक आहे त्याची यादी पुढे दिली आहे.
 
· सी.एन.सी. मशीन, कंट्रोल ऑपरेशन आणि प्रोग्रॅमिंग
· यंत्रण कौशल्य : यंत्रभागाचे यंत्रण कसे करायचे याचे ज्ञान
· मूलभूत गणिती कौशल्य : सूत्रे, आकडेमोड
· प्रोग्रॅमची रचना (स्ट्रक्चर) आणि बांधणी
· ऑफसेट काढणे, कॉम्पेन्सेशन घालणे, इतर समायोजन (अॅडजस्टमेन्ट)
· स्थिर आवर्तने कशी काम करतात याचे सखोल ज्ञान
· सब प्रोग्रॅमिंगचे सखोल ज्ञान आणि जोडणी
· यंत्रणेतील (सिस्टिम) पॅरामीटरचे ज्ञान, हेतू आणि काम करण्याची पद्धत 
या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रिपरेटरी कमांड (G कोड) आणि मिसलेनियस फंक्शन (M कोड) यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोग्रॅमरकडे अडचणी/प्रश्न सोडविण्याची वृत्ती, तार्किक विचार करण्याची पात्रता, संघटनात्मक (ऑर्गनायझेशनल) कौशल्य, चिकाटी आणि विश्लेषण करण्याची क्षमता असली पाहिजे.
 
आता आपण सबप्रोग्रॅमवर आधारित एक उदाहरण पाहू. चित्र क्र. 1 मध्ये एका यंत्रभागावर 5 भोके दाखविली आहेत. ही 5 भोके स्पॉट ड्रिल, ड्रिल आणि टॅप अशी 3 टूल वापरून करावयाची आहेत.
 

Fig. 1_1  H x W 
 
चित्र क्र. 1  
प्रत्येक भोकावर स्पॉट ड्रिल, ड्रिल आणि टॅपिंग अशी 3 कामे करावयाची आहेत. प्रमाणित (स्टँडर्ड) प्रोग्रॅमिंगमध्ये प्रत्येक भोकाच्या X, Y सहनिर्देशांकांचे (कोऑर्डिनेट्स) गणन (कॅल्क्युलेट) करावे लागेल. ही गोष्ट प्रत्येक टूलसाठी परत परत करावी लागेल, तसेच त्या गोष्टी आवश्यक असणाऱ्या स्थिर आवर्तनांचा वापर करावा लागेल. याउलट सबप्रोग्रॅममध्ये भोकाची मापे एकदाच काढावी लागतील आणि एका स्वतंत्र प्रोग्रॅममध्ये (सबप्रोग्रॅम) साठवावी (स्टोरेज) लागतील. आता आपण चित्र क्र. 1 साठी सबप्रोग्रॅम विरहित प्रोग्रॅम बनवू. यामध्ये पहिले टूल स्पिंडलमध्ये आहे असे समजावे.

सबप्रोग्रॅम नसलेला प्रोग्रॅम
प्रोग्रॅम झीरो खालच्या बाजूचा डावा कोपरा आणि यंत्रभागाचा टॉप

प्रोग्रॅम क्र. 1
टूल 01 - 90° स्पॉट ड्रिल (5 ही भोकांसाठीचा स्पॉट ड्रिल प्रोग्रॅम)
N1 G211
N2 G17 G40 G80
N3 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S1200M03 T02 H1
N4 G43 Z25.0 H01 M08
N5 G99 G82 R2.5 Z-3.4 P200 F200.0
N6 X39.0 H2
N7 Y45.0 H3
N8 X7.0 H4
N9 X23.0 Y26.0 H5
N10 G80 G00 Z25.0 M09
N11 G28 Z25.0 M05
N12 M01
 
प्रोग्रॅम क्र. 2
टूल 02 - 5 मिमी. टॅप ड्रिल (5 ही भोकांसाठीचा टॅप ड्रिल प्रोग्रॅम)
N13 T02
N14 M06
N15 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S950 M03 T03 . H1
N16 G43 Z25.0 H02 M08
N17 G99 G81 R2.5 Z - 10.5 F300.0
N18 X39.0 H2
N19 Y45.0 H3
N20 X7.0 H4
N21 X23.0 Y26.0 H5
N22 G80 G00 Z25.0 M09
N23 G28 Z25.0 M05
N24 M01
 
प्रोग्रॅम क्र. 3
टूल - T03 M6 X 1 टॅप
N25 T03
N26 M06
N27 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S600 M03 T01 H1
N28 G43 Z25.0 H03 M08
N29 G99 G84 R5.0 Z-11.0 F600.0
N30 X39.0 H2
N31 Y45.0 H3
N32 X7.0 H4
N33 X23.0 Y26.0 H5
N34 G80 G00 Z25.0 M09
N35 G28 Z25.0 M05
N36 G28 X23.0 Y20.0
N37 M30
 
सबप्रोग्रॅमचा वापर करून प्रोग्रॅम
 
कोणत्याही प्रोग्रॅममध्ये सार्वजनिक (कॉमन) माहिती वारंवार द्यावी लागणे ही गोष्ट वाईट मानली जाते. उदाहरणार्थ, ड्रॉइंगवर एका भोकाचे स्थान (लोकेशन) बदलले, तर प्रोग्रॅममध्ये कमीतकमी 3 बदल करावे लागतात. सबप्रोग्रॅमचा वापर केल्यास प्रोग्रॅम लांबी कमी तर होईलच, त्याचबरोबर उत्तम प्रकारे बदल ही करता येतील. वर उदाहरण म्हणून घेतलेल्या चित्र क्र. 1 मधील यंत्रभागाचा प्रोग्रॅम, सबप्रोग्रॅम कॉल करून पुढीलप्रमाणे होईल. 
 
मुख्य प्रोग्रॅम सबप्रोग्रॅमसह
प्रोग्रॅम झीरो डावीकडचा खालचा कोपरा आणि यंत्रभागाचा टॉप
 
T01 - 90° स्पॉट ड्रिल
N1 G21
N2 G17 G40 G80
N3 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S1200 M03 T02
N4 G43 Z25.0 H01 M08
N5 G99 G82 R2.5 Z-3.4 F200 0L0
N6 M98 P1001
N7 G80 G00Z25.0 M09
N8 G28 Z25.0 M05
N9 M01
 
T02 - 5 मिमी. टॅप ड्रिल
N10 T02
N11 M06
N12 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S5950 P103 T03
N13 G43 Z25.0 H02 M08
N14 G99G81 R2.5 Z-10.0 F300.0 LO
N15 M98 P1001
N16 G80 G00 Z25.0 M09
N17 G28 Z25.0 M05
N18 M01

T03 - पुढील टॅप
N19 T03
N20 M06
N21 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S600 M03 T01
N22 G43 Z25.0 H03 M08
N23 G99 G84 R5.0 Z - 11.0 F600.0 L0
N24 M98 P1001
N25 G80 G00 Z25.0 M09
N26 G28 Z25.0 M05
N27 G28 X23.0 Y26.0
N28 M30
%
 
5 भोकांसाठी स्थान (लोकेशन) सबप्रोग्रॅम
N101 X7.0 Y7.0 H1
N102 X39.0 H2
N103 Y45.0 H3
N104 X7.0 H4
N105 X23.0 Y26.0 H5
N106 M99 - सबप्रोग्रॅम संपला
 
महत्त्वाचे : सबप्रोग्रॅममध्ये फक्त भोकांच्या स्थानाची (X, Y सहनिर्देशांक) माहिती घेतली जाते. L0 स्थिर (फिक्स्ड्) आवर्तन ब्लॉकमध्ये समाविष्ट केले आहे. हे सर्व टूलसाठी लागू आहे. L0 हा स्थिर (फिक्स्ड्) आवर्तन पॅरामीटर आहे.
 
L0 चा अर्थ असा आहे की, चालू असलेल्या (करंट) ब्लॉकमध्ये आवर्तने कार्यान्वित केली जात नाहीत. चालू असलेल्या ब्लॉकमध्ये प्रोग्रॅम केलेला डाटा मेमरीमध्ये साठविला जातो आणि सबप्रोग्रॅम जेव्हा प्रोसेस केला जातो त्यावेळी तो डाटा वापरला जातो.
वरील उदाहरणातील नवीन प्रोग्रॅम पहा. त्याची लांबी बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. 
 
मुख्य प्रोग्रॅम सबप्रोग्रॅमसह
प्रोग्रॅम झीरो डावीकडील खालचा कोपरा आणि यंत्रभागाचा टॉप

T01 - 90° स्पॉट ड्रिल
N1 G21
N2 G17 G40 G80
N3 G90 G00 X7.0 Y7.0 S1200 M03 T02 H1
N4 G43 Z25.0 H01 M08
N5 G99 G82 R2.5 Z-3.4 P200 F200.0 L0
N6 M98 P1002
N7 M01

T02 - 5 मिमी. टॅप ड्रिल
N8 T02
N9 M06
N10 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S950 M03 T03 H2
N11 G43 Z25.0 H02 M08
N12 G99 G81 R2.5 Z-10.5 F300.0 L0
N13 M98 P1002
N14 M01 
 
T03 - M6 X 1 टॅप
N15 T03
N16 M06
N17 G90 G54 G00 X7.0 Y7.0 S600 M03 T01 H1
N18 G43 Z25.0 H03 M08
N19 G99 G84 R5.0 Z-11.0 F600.0 L0
N20 M98 P1002
N21 G28 X23.0 Y26.0
N22 M30
 
5 भोकांचा स्थान (लोकेशन) सबप्रोग्रॅम
N101 X 7.0 Y7.0 H1
N102 X39.0 H2
N103 Y45.0 H3
N104 X 7.0 H4
N105 X23.0 Y26.0 H5
N106 G80 G00 Z25.0 M09 (कॅन्सल सायकल आणि क्लिअर)
N107 G28 Z25.0 M05 Z अक्ष होम रिटर्न
N108 M99
%
 
8625975219
सतीश जोशी सी.एन.सी. मशिनिंगमधील तज्ज्ञ असून ते सल्लागार म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयांत अध्यापनाचे काम करीत असतानाच त्यांचे सी.एन.सी. लेथवरील पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी संगणकाविषयी मराठी, इंग्रजी भाषेत पुस्तके लिहिली आहेत.