जाहिरात विषयी

Udyam Prakashan Marathi    10-Nov-2020
Total Views |
जून 2017 मध्ये स्थापना झाल्यापासून उद्यम प्रकाशन यांत्रिकी अभियांत्रिकीमधील (मेकॅनिकल इंजिंनिअरिंग) उत्पादन क्षेत्राला समर्पित मराठी मासिक ‘धातुकाम’, हिंदी मासिक ‘धातुकार्य’, कन्नड मासिक ‘लोहकार्य’ आणि गुजराती मासिक ‘धातुकाम’ प्रकाशित करीत आहे. लवकरच तमीळ मासिकाची आवृत्ती आम्ही प्रकाशित करणार आहोत. जाहिरातदार आणि वाचकांकडून या मासिकाला मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. 50,000 हून अधिक लघु, मध्यम आणि मोठ्या कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक संस्थांपर्यंत हे मासिक प्रत्येक महिन्याला पोहोचत आहे.
वाचकांना संबंधित उत्पादनांची माहिती देऊन मासिकाचे मूल्यवर्धन करण्याबरोबर मासिक सुरळीतपणे चालविण्यासदेखील जाहिराती मदत करतात, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. आपल्या उत्पादनांच्या वैशिष्ट्यांविषयी त्याच्या वापरकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची आपणास ही एक उत्तम संधी आहे. आपल्या जाहिराती 50,000 हून अधिक कंपन्यांपर्यंत पोहोचतील, एवढेच नाही तर त्यांचे वाचन आमच्या मासिकातील लेखांच्या नियमित वाचनामुळे तांत्रिकदृष्ट्या माहितगार झालेल्या वाचकवर्गाद्वारे केले जाईल.
आमच्या वेबसाइटवरदेखील आपल्या उत्पादनांची डिजिटली जाहिरात करण्याचा पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे. 
या प्रतिष्ठित मासिकामध्ये जाहिराती देऊन, भारतीय उत्पादन उद्योगाच्या अगदी तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत हे ज्ञान आणि माहिती प्रादेशिक भाषांमध्ये पोहोचविण्याच्या आमच्या या राष्ट्रीय कार्यक्रमाला आणि अनोख्या प्रयत्नांना आपण पाठिंबा द्यावा, अशी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे. 
वेळापत्रक आणि जाहिरातींच्या दरांच्या माहितीसाठी आमच्या प्रतिनिधींशी अवश्य संपर्क साधा. 
 
भ्रमणध्वनी : +91 9307909747
ईमेल: [email protected]